शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा..

पुणे : राज्यात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विक्रीला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या कामासाठी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची खरेदी केली तर त्यांना दीड लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नितीन गडकरी यांच्या इलेक्ट्रिक धोरणाला राज्यात देखील चांगले दिवस येण्याची चिन्ह आहेत. टू – व्हिलर, फोर – व्हिलर बरोबर आता महाराष्ट्रात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विक्रीला चालना मिळावी. म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खर्चात कपात व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. एकंदरीत शेतकरी हितासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशात आणि राज्यात इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.
भाववाढीच्या पर्यायाने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे. वाढत्या डिझेलच्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. पण तुलनेने उत्पन्न मात्र तेवढं मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अनुदान दीड लाख रुपये इतके आहे
दरम्यान, डिझेलचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत महागात पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची सबसिडी देखील देणार आहे.