पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! लोणावळा-मावळमधील ‘या’ पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी…


पुणे : पर्यटकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लोणावळा आणि मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात आदेश जारी करत काही ठिकाणांवर कलम १६३ अंतर्गत मनाई लागू केली आहे.

तसेच गेल्या वर्षी पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठी गेलेले एक संपूर्ण कुटुंब पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. ही अत्यंत हृदयद्रावक घटना पुन्हा घडू नये यासाठी यंदा प्रशासन अधिक सतर्क झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाळ्यात पाण्याचा वेग वाढल्याने आणि पर्यटकांची गर्दी वाढल्याने अपघातांचा धोका मोठा असतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुढील ठिकाणांवर प्रवेश बंदी आहे.

एकविरा देवी मंदिर, कार्ला लेणी, भाजे लेणी व धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना डॅम विशेष बाब म्हणजे, भुशी डॅमला या यादीतून वगळण्यात आले आहे. मात्र, तिथेही पर्यटकांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

ही बंदी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत बंदी असलेल्या स्थळांवर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे पर्यटकांनी आपल्या सुरक्षेसाठी आणि कायद्याचे पालन करत पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!