दौंड हादरलं!! दोन वर्षांपासून जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार, चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल….

दौंड : दौंड तालुक्यतून धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, दौंड तालुक्यातील भरतगाव येथे चार नराधमांनी तब्बल दोन वर्षे एका महिलेवर बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. अत्याचाराला कंटाळून पीडितीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यामध्ये विकास पोपट ढमाळ, कुलदिप सुरेश टेमगिरे, संजय राजाराम वाघमोडे आणि अरुण प्रकाश गाडेकर (सर्व रा. भरतगाव ता. दौंड, जि.पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सर्व आरोपिंवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे रात्री महिलेला शेतात नेवून तिच्यावर बलात्कार करत होते.
२०२३ पासुन ते २७ एप्रिल २०२५ रोजी हे प्रकार सुरूच होते. मुख्य आरोपी विकास ढमाळ याने पीडित महिलेला धमाकावून इतर आरोपिंसोबत तीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. सुरुवातीला तोच हे कृत्य करत होता, नंतर मात्र त्याचे मित्र देखील याठिकाणी येत होते. शारीरिक संबंधांना विरोध दर्शवला असता पीडितेस आरोपी जिवे ठार मारण्याची धमकी देत होता.
या अत्याचाराला कंटाळलेल्या पीडितेला शाररीक व मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने यवत पोलीस ठाण्यात चारही नराधम आरोपिंच्या विरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत यवत पोलिसांनी आरोपी विकास पोपट ढमाळ, कुलदिप सुरेश टेमगिरे, संजय राजाराम वाघमोडे आणि अरुण प्रकाश गाडेकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत. याबाबत आरोपींवर कारवाईची मागणी केली जात आहे.