हगवणे कुटुंबाचा धक्कादायक कारनामा उघड, बँक अधिकारी बनून केलं असं काही की..


पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांची यादी दिवसेंदिवस समोर येत आहे. आता वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्या फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक अंक समोर आला आहे.

प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते त्याचा ताबा स्वतःकडे घेण्यापर्यंत, हगवणे माय-लेकानेच हा संपूर्ण कट रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ‘थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केलाच नाही,’ असा धक्कादायक खुलासा इंडसइंड बँकेने केला आहे, ज्यामुळे हगवणे कुटुंबाचा बनाव उघड झाला आहे.

लता आणि शशांक हगवणे यांनी प्रशांत येळवंडे नामक व्यक्तीला एका जेसीबीची विक्री केली होती. हा जेसीबी मुळात इंडसइंड बँकेकडून हप्त्यांवर घेण्यात आला होता. त्याचे हप्ते सुरू असतानाच, हगवणे कुटुंबीयांनी येळवंडे यांना जेसीबीची विक्री केली.

दरम्यान, यासाठी त्यांनी येळवंडेकडून ११ लाख ७० हजार रुपये घेतले. मात्र, त्यांनी बँकेचे कर्ज प्रत्यक्षात फेडले नव्हते. यानंतर काही दिवसांनी बँकेने हा जेसीबी जप्त केला. यानंतर, शशांक हगवणे यांनी पैसे देण्याचे कबूल केले, परंतु प्रत्यक्षात पैसे दिले नसल्याचा आरोप येळवंडेकडून केला जात आहे.

बँकेने जप्ती आणलेला जेसीबी काही दिवसांनी शशांक हगवणे यांच्या घराजवळ आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे, प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्ती आणलेला जेसीबी गोदामातून जप्त कसा झाला? यासंदर्भात पोलिसांनी बँकेची चौकशी केली. त्यावेळी हा सगळा कट हगवणे माय-लेकाचाच होता, हे उघड झाले आहे.

त्यांनीच स्वतःचे माणसे पाठवून ‘बँक अधिकारी’ असल्याचे भासवून जेसीबी जप्त केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जप्त केलेला जेसीबी ज्यांच्या गोदामात ठेवला होता, त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी देखील आता हगवणेंनी केलेल्या फसवणुकीचे कारनामे उघड केले आहेत. येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी हा आमच्या गोदामापर्यंत पोहोचलाच नाही, अशी धक्कादायक माहिती खांडेभराड यांनी पोलीस चौकशीत दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!