उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का!! चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार, सांगलीत राजकीय घडामोडींना वेग…

पुणे : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले चंद्रहार पाटील हे सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे भेट घेतली होती.
मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने ही भेट झाल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेला सोडतील याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांनी उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती. भेटीनंतर त्यांनी मी पक्षासोबत आहेत, कामानिमित्त मी त्यांना भेटलो असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं होतं.
असे असताना आता ते पक्ष सोडणार असल्याचे ठरले आहे. सांगली लोकसभा निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे काँग्रेसकडून विशाल पाटील यांची कोंडी झाली. विशाल पाटील, विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली.
असे असताना तसे काही झाले नाही. विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंड केले. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. सांगलीत तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली. यामध्ये विशाल पाटील यांचा विजय झाला. चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिटही जप्त झाले. ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेससोबत वितुष्ट घेतले.
आता त्यांनीच पक्षाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटील हे सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे आव्हान मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिले आहे. यामुळे सांगली जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.