आनंदाची बातमी! एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त, आजपासून नवे दर लागू, जाणून घ्या…


मुंबई : सध्या LPG गॅस सिलेंडरच्या दरात बदल केले आहेत. हा बदल व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरात आहे. 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे. आता हा सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत आता हा सिलेंडर 1674.50 रुपयांना मिळेल.

व्यावसायिक एलपीजीचे दर प्रति 19 किलो सिलिंडर सुमारे 17 रुपयांनी कपात करण्यात आली होती. एप्रिलमध्ये 42 रुपयांची कपात केली गेली होती. त्यामुळे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. नवीन दर 1 जूनपासून लागू झाले आहेत.

कमर्शियल LPG सिलेंडरचा वापर हा हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक ठिकाणी केला जातो. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या महिन्यातही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला नव्हता. याबाबत अनेकांना अपेक्षा होती. सध्या मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ही 852.50 रुपये आहे.

एप्रिल महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ केली गेली होती. त्याचा फटका सर्वसामान्यांसहित उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही बसला होता. आज झालेले बदल हे महिन्याच्या पहिल्याच दिवशी झाल्याने आगामी काळात अजून काही बदल होतील, असं वाटतं नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आज घरगुती गॅस सिलेंडर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 853 रुपयांना उपलब्ध होत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे 14.2 किलो वजनी सिलेंडर 852.50 रुपयांना उपलब्ध होत आहे. काही दिवसांपासून हे दर काहीअंशी स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!