ऑपरेशन सिंदूरनंतरची मोदींची जवानांशी भेट गाजली! पाकिस्तानचा दावा मोदींनी ऑन द स्पॉट जाऊन हाणून पाडला, नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील आदमपूर हवाई तळावर हवाई दलाच्या जवानांची भेट घेतली. तसेच ते जालंधरमधील आदमपूर हवाई तळावर पोहोचले. त्यांनी हवाई दलाच्या जवानांची भेट घेतली. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर मोदींनी हवाई दलाच्या जवानांची घेतलेली भेट महत्त्वाची होती.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी जवानांचे कौतुक करत भारत मातेच्या घोषणा दिल्या. पाकिस्तानने आदमपूर हवाई तळ हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानकडून तसा खोटा प्रचार सुरु होता. पण त्याच आदमपूर हवाई तळाला भेट देत मोदींनी पाकिस्तानच्या दाव्याची हवा काढली. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तानने केलेले हल्ले भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडले आणि पाकिस्तानचे मनसुबे उधळले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळाला भेट देत पाकिस्तानचा दावा खोडून काढला. यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

दरम्यान, आदमपूर हवाई तळावर हवाई दलाची मिग-२९ विमानं असतात. आज मोदी या हवाई तळावर उतरले, तेव्हा त्यांच्या सोबत एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह होते. आदमपूर हवाई तळ पाकिस्तानी सीमेपासून जवळ आहे. मात्र याठिकाणी जवान तत्पर असतात.

ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ बेचिराख केले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं भारताच्या सैनिकी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताने मात्र पाकिस्तानला एकदाही संधी न देता प्रहार केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!