वाहन चालकांसाठी सर्वात महत्वाची बातमी! आता ‘हा’ कागद दाखवल्यावरच मिळणार पेट्रोल, डिझेल, जाणून घ्या..


मुंबई : वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यातून होणाऱ्या वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या धोरणाला मंजुरी दिल्याचे स्पष्ट केलं आहे. राज्यात लवकरच ‘नो पीयूसी, नो इंधन’ हे नवे धोरण लागू होणार. यामध्येअनेक नियम लावले आहे.

महाराष्ट्र सरकारनं पर्यावरण रक्षणासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसेल, तर त्यांना पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही. वाहनचालकाने इंधन भरताना PUC सर्टिफिकेट दाखवणे बंधनकारक असणार आहे. पेट्रोल पंपावर सर्टिफिकेट नसल्यास वाहनचालकास इंधन देण्यात येणार नाही.

राज्यात वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. अनेक वाहनचालक PIUC प्रमाणपत्र बनवत नाहीत तसेच बनावट सर्टिफिकेट वापरतात. त्यामुळेच सरकारने या गंभीर समस्येकडे लक्ष देत हा निर्णय घेतला आहे. सध्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकसारख्या शहरांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

यामुळे चिंता वाढली आहे. सरकार एक QR कोड-आधारित डिजिटल पीयूसी सिस्टीम विकसित करत आहे. याद्वारे पेट्रोल पंपावर त्वरित स्कॅनिंग आणि पडताळणी करता येणार आहे. हे सर्टिफिकेट ऑनलाईन डेटाबेसशी लिंक केले जाणार आहे, ज्यामुळे बनावट कागदपत्रांना आळा बसणार आहे. हे धोरण लवकरच अंतिम मंजुरीसाठी सादर होणार आहे.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत संपूर्ण राज्यात हे धोरण लागू केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हे धोरण लागू करण्याआधी राज्य सरकार जनजागृती मोहीम राबवणार आहे. वाहनचालकांना पीयूसी काढण्यासाठी निर्धारित कालावधी दिला जाईल. पेट्रोल पंप चालकांनाही प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!