पाकिस्तान सुधारणार नाही! आंतरराष्ट्रीय दबाव न जुमानता त्यांचे दोन तुकडे करा, देश तुमच्या पाठीशी आहे, रोहित पवार यांची आक्रमक भूमिका….


मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी होऊन देखील पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. यामुळे पाकिस्तान काय सुधारण्याचे नाव घेत नाही. युद्धबंदी होऊन तीन तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने ड्रोनहल्ले करत पुन्हा एकदा कुरापत काढली आहे.

यामुळे पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी केली जात आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही.

पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल तर १९७१ मध्ये ज्याप्रमाणे स्व. इंदिरा गांधीनी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता कणखर भूमिका घेत पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याचप्रकारे बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज आहे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच ते म्हणाले, आपली सेना सज्ज आहे, सेनेवर देशाचा विश्वास आहे, सरकारने निर्णय घ्यावा, संपूर्ण देश आणि सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत! असेही पवार यांनी म्हटले आहे. यामुळे आता भारताकडून शांत झालेले युद्ध पुन्हा सुरू होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!