मित्रांमध्ये रुबाब वाढवण्यासाठी नको तेच कृत्य, हडपसरमध्ये धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अशातच आता पुणे पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. मित्रांमध्ये रुबाब वाढवा म्हणून तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी चिराग संजय सर्जेराव (वय.२३) याला हडपसर पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चिरागच्या संशयास्पद वर्तनाची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.

झडती दरम्यान, पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. हडपसर पोलिस ठाण्यात चिरागविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

बेकायदेशीर शस्त्रांचा स्रोत शोधण्यासाठी आणि चिरागचा कोणत्या गुन्हेगारी संघटनांशी संबंध आहे. का याचा शोध घेण्यासाठी पोलिस काम करत आहेत. शहरातील बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. पीएसआय हसन मुलाणी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने हि कारवाई केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!