ऑनड्यूटी रिक्षातून जायची, लिंबू-बाहुल्या घेऊन यायची, वळसंगकरांच्या रुग्णालयात मनीषाची काळी जादू, धक्कादायक माहिती आली समोर..

सोलापूर : सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी रात्री ८.० वाजताच्या दरम्यान स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉ. शिरीष वळसंगकर केला आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या एका विश्वासू व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. ज्याचा शिरीष वळसंगकर यांना वैताग आला होता. रुग्णालयात सुरू असलेल्या विविध विषयांत त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. मनीषा या काळी जादू देखील करत असल्याचा संशय आम्हा सगळ्यांना होता.
अमावास्येच्या दिवशी मनीषा माने ऑन ड्युटीवर असताना अचानक मधूनच रिक्षातून कुठेतरी जायच्या. तसेच येताना लिंबू आणि बाहुल्या सोबत घेऊन यायच्या. त्यानंतर लिंबू आणि काळ्या बाहुल्या रुग्णालयात ठेवून कामाला जायच्या, अशी माहिती डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या विश्वासू व्यक्तीने दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. वळसंगकर यांचे पुत्र आणि सुनेला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत मनीषा मुसळे या महिलेचीच चौकशी करण्यात आली होती. मात्र, आता वळसंगकर यांच्या कुटुंबाचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.