व्याह्यासोबतच विहीणबाई झाली फरार!! उत्तर प्रदेशमध्ये प्रेमाची अनोखी कहाणी आली समोर…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बदायूंमधून नातेसंबंधांना लाज आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ममता नावाची एक महिला तिच्या मुलीचा सासरा शैलेंद्र ऊर्फ बिल्लूसोबत घरातून पळून गेली. दोघेही टेम्पोतून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ममताचा पती सुनील कुमार हा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहे, तो नेहमी लांबच्या प्रवासाला जातो. या दरम्यानच ही विचित्र प्रेमकहाणी सुरू झाली. दरम्यान, ममताची तिच्या मुलीचे सासरे शैलेंद्र यांच्याशी जवळीक वाढली.
सुनील म्हणाला, ‘मी महिन्यातून एक-दोनदा घरी येतो आणि वेळेवर पैसेही पाठवतो. पण माझी पत्नी ममता त्याच्यासोबत पळून गेली आहे, घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन गेली आहे.
ममताचा मुलगा सचिननेही या प्रकरणी खुलासा केला आहे. सचिन म्हणाला, पप्पा घरी राहत नव्हते, मम्मी दर तिस-या दिवशी त्यांना फोन करायची. आम्हाला दुस-या खोलीत पाठवायची. आता ती त्याच्यासोबत पळून गेली आहे.
शेजारी अवधेश कुमार म्हणाले की, शैलेंद्र अनेकदा रात्री १२ वाजता यायचा आणि सकाळी निघून जायचा. तो नातेवाईक असल्याने परिसरातील लोकांना काहीही संशय आला नाही. पण आता सत्य सर्वांसमोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात सुनील कुमार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.