मैत्रिपूर्ण संबंधातून बावीस वर्षीय तरुणीची फसवणूक ! उरुळीकांचन येथील तरुणाने साडे आकरा लाख किंमतीचे सोने परस्पर लांबविले…

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील एका बावीस वर्षीय महिलेची मैत्रीच्या संबंधातून साडे अकरा लाखाच्या किमतीचे दागिने मित्रानेलांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बावीस वर्षीय तरुणीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आकाश बाजीराव तिंबोळे (वय २७ वर्षे. रा. दत्तवाडी घुले वस्ती उरळी कांचन ता. हवेली जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तरुणी व आकाश यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. या संबधातून आकाशने मैत्रणीला विश्वासात घेऊन १तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस तसेच सोन्याच्या पिळ्याच्या ४ अंगठ्या ३.५० तोळ्याच्या तसेच सोन्याच्या ३.५० तोळे वजनाचा हार तसेच आईच्या गळ्यातील सोन्याचे ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र, आईचे कानातील १ तोळे वजनाचे सोन्याचे टॉप्स असे एकूण १४ तोळे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ११ लाख २० हजार रुपये तर रोख स्वरूपात ४०,००० असा एकूण ११ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम आरोपी आकाश तिंबोळे मैत्रीणीची फसवणूक करुन परस्पर विल्हेवाट लावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपाससहाय्यक पोलिस निरीक्षक बाजगिरे हे करीत आहे.