अजितदादांची मोठी खेळी, ४ बडे नेते राष्ट्रवादीत जाणार, जिल्ह्याचे राजकारण बदलणार…


सांगली : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल घडली असून तब्बल चार माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व माजी आमदार लवकरच मुंबईत एका विशेष कार्यक्रमात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे सांगलीतील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासोबतच भाजपमधील काही प्रमुख नेत्यांनीही अजितदादांकडे पाठ फिरवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची तयारी दर्शवली आहे. या चार माजी आमदारांमध्ये शिराळ्याचे शिवाजीराव नाईक , कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख आणि जतचे विलासराव जगताप यांचा समावेश आहे.

या सर्वांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध पक्षांतून निवडणूक लढवली असून अनेकदा बंडखोरीची भूमिका देखील घेतली होती. या नेत्यांसोबतच आटपाडीतील भाजपचे माजी युवा मोर्चा अध्यक्ष अनिल पाटील आणि जतमधील अपक्ष आमदार तमनगौडा रवी पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील अजित पवार यांच्या गटाची ताकद अधिक मजबूत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सत्तास्थानांवर याचा मोठा प्रभाव पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. इस्लामपूर मतदारसंघाचे माजी उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्याकडे पक्षवाढीची जबाबदारी देण्यात आली असून ते जिल्ह्यातील नाराज नेते, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून पक्षात आणण्याचं काम करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!