माऊली गव्हाणेच्या खून प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, खुनाच खरं कारण आलं समोर, समलैंगिक संबंध …

शिरूर : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माउली सतीश गव्हाणे याचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली होती शेतातील विहिरीत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

याप्रकणी आता अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दाणेवाडी येथूनच काल (ता.१७ )रात्री एका आरोपीला अटक केली आहे. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय- २० वर्ष, रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी सागर गव्हाणे याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक केली असून, त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. त्यामुळे अहिल्यानगर पोलिसांना दाणेवाडी येथील क्रूर खूनाचा छडा लावण्यास यश आले असून,दुसरा प्रमुख आरोपीही दाणेवाडीचाच आहे.

त्याचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची घटना समलैंगिकतेतून झाली असून, सागर गव्हाणे व दाणेवाडी येथील दुसरा युवक यांचे समलैंगिक संबंध होते आणि ते संबंध माऊली गव्हाणे यास माहिती होते.
त्यामुळे सागर गव्हाणे व त्याच्या मित्रांनी माऊली गव्हाणे याचा इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने निर्घृण खून केला. अशी माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेमध्ये आणखी तीन आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांचाही शोध सुरु असून, त्यांच्याही मुसक्या लवकरच आवळल्या जातील असे अहिल्यानगर पोलिसांनी सांगितले आहे.