अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लाडक्या बहिणी अन् पुन्हा आलो, पुन्हा आलो…अजितदादांकडून लाडक्या बहिणींचा उल्लेख

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात महापुरुषांना वंदन करून केली.
अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक स्वभावाला फाटा देत अर्थसंकल्प सादर करताना कवितांची पेरणी केली. आपल्या भाषणाच्या पहिल्या काही मिनिटांतच त्यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख केला.
अजित पवारांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कवितांची पेरणी केली. अजितदादांनी म्हटले की, जनतेने महायुतीला अभूतपूर्व कौल दिला. मतदारांनी विश्वास हा जबाबदारीची जाणीव करून देणारा असून आम्हाला, सरकारला याची जाणीव आहे. केंद्र सरकारने आयकरात सूट देऊन मध्यमवर्गाला दिलासा दिला, रेल्वे-पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अजित पवार यांनी कवितांच्या ओळी सादर करत लाडक्या बहिणींचा उल्लेख केला. लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो असे अजित पवार यांनी म्हणतात सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी जोरदार बाके वाजवून प्रतिसाद दिला आहे.