सावधान! ऑफिसमध्ये ८-९ तास बसून काम करताय?, मग एकदा ही बातमी वाचाच..


Office Work : अनेक जण दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करतात, ज्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सतत ६-८ तास बसून राहिल्याने मसल्स कमकुवत होतात, वजन वाढते आणि मानसिक तणावासारख्या समस्या उद्भवतात. मात्र, काही साध्या सवयी अवलंबून तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता.

सतत बसून राहिल्याने होणाऱ्या आरोग्य समस्या

दीर्घकाळ एका पोश्चरमध्ये बसून राहिल्यास मणक्यांवर ताण येतो.
सतत बसल्याने खांद्यांमध्ये आणि हातांमध्ये वेदना जाणवू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन त्रास निर्माण होऊ शकतो.
कमी हालचालीमुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जळत नाही आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.

सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि मानसिक तणाव वाढतो.
शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे थकवा आणि सुस्ती जाणवते.
शारीरिक हालचाली अभावामुळे झोपेच्या समस्या वाढू शकतात.

हे उपाय अवलंबा आणि रहा तंदुरुस्त
सतत बसून काम करत असल्यास प्रत्येक ३०-४० मिनिटांनी उठून काही पावले चालावे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला ऑक्सिजन मिळतो.
ऑफिसमध्येच हलक्या फुलक्या स्ट्रेचिंग व्यायामाचा समावेश करा, ज्यामुळे स्नायूंवरील ताण कमी होईल.
कामाच्या वेळी लहान-लहान ब्रेक घ्या. यामुळे शारीरिक हालचाल वाढेल आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येईल.

भरपूर पाणी प्या, कारण शरीर हायड्रेटेड राहिल्यास मेटाबॉलिज्म सुरळीत राहतो.
संतुलित आहार घ्या आणि ताज्या फळ-भाज्यांचा आहारात समावेश करा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!