पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘हा’ महत्वाचा मेट्रो मार्ग होणार लवकरच सुरु, वाहतूक कोंडी सुटणार…

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाचा असलेला माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे कामाला गती मिळणार आहे. प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ परिसरातील राजभवन कार्यालयाजवळील २६३.७८ चौ.मी. जागा जीन्यासाठी आवश्यक होती.
आता या प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. यांना १०० टक्के जागा हस्तांतरित केल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हा मेट्रो प्रकल्प २३.२०३ किलोमीटर लांबीचा आहे. त्याची अंमलबजावणी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर करण्यात येत आहे. या प्रकल्पास ९ फेब्रुवारी २०१८ रोजी शासनाने मान्यता दिली होती. यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात कामाला गती मिळणार आहे.
याबाबत आतापर्यंत या प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राजभवन कार्यालयाने या जागेच्या हस्तांतरणास मंजुरी दिल्याने आता मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.