संतोष देशमुखांचे मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या, बीडचं जाणेगाव हादरलं…


बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेत. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळले आहे.

पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना हे फोटो आणि व्हिडिओ पुराव्याच्या स्वरूपात सादर केले. त्यानंतर माध्यमांमध्ये ते फोटो झळकल्यावर बीडमधील केज तालुक्यातील जाणेगाव येथील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

केज तालुक्यातील जाणेगाव येथील अशोक हरिभाऊ शिंदे (वय.२३) या तरुणाने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे फोटो पाहून आत्महत्या केली. संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर केज येथे बंद पुकारण्यात आला होता, त्यात अशोक शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. बंदनंतर घरी परतल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी अशोक शिंदे यांनी पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला, अश्विनी माने हिला फोन केला. या फोनमध्ये त्यांनी आपल्या मनातील अस्वस्थता व्यक्त करत, मला टोकाचा पाऊल उचलावसं वाटत आहे, असे म्हटले. बहिणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र अशोक यांनी मंगळवारी संध्याकाळी आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!