मुंबई, पुणे, नागपूर झालं, आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातील लोकांचे मेट्रोचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या…

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मेट्रोची भेट मिळणार आहे. नाशिक हे राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचे शहर असून या शहराला आता मेट्रोची भेट मिळणार आहे. नाशिक मेट्रोचा विषय हा गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र गेल्या पाच वर्षात नाशिक मेट्रो प्रकल्पाबाबत कोणतीच हालचाल झालेली नाही. मात्र आता हे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.
फडणवीस यांनी निओ मेट्रो किंवा शहराला सुसह्य ठरेल अशा पर्यायी मेट्रोच्या मॉडेलचा विचार सुरू असल्याचे सुतोवाच केले होते. नाशिकमध्ये मेट्रो सुरू झाली तर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे आणि यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.
दरम्यान, नाशिक शहरासाठी मेट्रोचे लाइट रेल ट्रान्झिट एलआरटी मॉडेलबाबत अभ्यास सुरू झाला. राज्याचे मुख्य सचिव सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत केंद्र सरकारच्या महामेट्रोचे अधिकारी तसेच राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नवीन मॉडेल तयार करावे, अस ठरलं आहे.
दरम्यान, 2019 मध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिली टायरबेस निओ मेट्रो आपल्या नाशिकमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र नंतर ते रद्द झालं. आता मात्र हालचालींना वेग आला असून देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.