कदमवाकवस्ती येथे नववीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या टरेसेवरून मारली उडी, प्रकृती गंभीर, घटनेने उडाली खळबळ…


उरुळी कांचन : नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजी नगर परिसरात गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

समृद्धी सतीश ढगे (वय.१५, रा.कदमवाकवस्ती ता.हवेली) असे टेरेसवरून उडी मारलेल्या मुलीचे नाव आहे. तिला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, समृद्धी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. तर ती इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. गुरुवारी कुटुंबातील सर्वांनी रात्री नऊ वाजण्याच्या जवळ केले. व दहा वाजण्याच्या सुमारास आपापल्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होते.

दरम्यान, समृद्धी हिने इमारतीच्या टेरेसवरून गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर समृद्धी गंभीर जखमी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार केतन धेंडे व त्यांच्या सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी जखमी समृद्धीला तिच्या नातेवाईकांच्या मदतीने त्वरित लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. समृद्धी वर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.

दरम्यान, समृध्दीने इमारतीच्या टेरेसवरून उडी का मारली? याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी त्यादृष्टिकोनातून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!