साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर २१ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार, बुलढाण्यातील धक्कादायक घटना…
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2023/06/rape-1.jpeg)
बुलढाणा : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे २१ वर्षीय नराधमाने साडेचार वर्षीय बालिकेला गावाजवळ असलेल्या संत्राच्या मळ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
सुनील कालुसिंग निगवाले अस या नारधमाचं नाव असून तो मध्यप्रदेशातील डोईफोडिया गावाचा रहिवासी आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी गुन्हा दखल करत आरोपीला अटक केली आहे. तर पीडित बालिकेवर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात अलीकडे लैंगिक अत्याचारांच्या घटनेत सातत्याने वाढ झाल्याचे पुढे आले आहे. अशातच पुन्हा एकदा अवघ्या चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.