सर्वात मोठी बातमी! आता राज्यात शेतजमीनीच्या वापरासाठीची NA अट रद्द, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…


मुंबई : राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता यापुढे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगरशेती (NA) परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे.

याबाबत एक पत्रक जारी करण्यात आले आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, याबाबत महसूल मंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

यापूर्वी जमीनधारकांना औद्योगिक वापरासाठी मानीव अकृषिक वापराची परवानगी घेणे आवश्यक होते. असे असताना त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एनए करण्यासाठी लागणाऱ्या वेळेएवढाच आहे, हे शासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आता संबंधित उद्योजकाने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेणे आवश्यक आहे. यामुळे किचकट प्रक्रिया नसणार आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, उद्योगासाठी वापर करावयाचा असल्यास परवानगीची तरतूद रद्द होण्यासाठी काही काळाचा अवधी लागणार आहे. तोपर्यंतच्या कालावधीत एखाद्याला जमीन उद्योगासाठी वापरायची असल्यास त्यालाही NA परवानगी घेणे आवश्यक असणार नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!