लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? समोर आली महत्त्वाची अपडेट…
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
अशातच आता फेब्रुवारी महिन्याला हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेले नाही परंतु या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही कदाचित हप्ता येऊ शकतो. त्यामुळे २० दिवसांमध्येही कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात.
दरम्यान, फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा आहे. त्यामुळे कदाचित २० तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मागील तीन महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे येत होते. त्यामुळे या महिन्यातही पैसे तेव्हाच येऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे महिलांना घाबरुन अर्ज माघारी घेतले आहेत.