गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार शिरुरमध्ये जेरबंद, एक पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त…
शिरूर : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. रेकॉर्ड वरील आरोपी दिपक बबन गुंजाळ रा. गोलेगाव रोड, शिरूर, हा शिरुर बायपास रोडवर उभा असून त्यांचे कंबरेला गावठी पिस्टल लावले आहे, अशी माहिती मिळाली होती.
यानंतर स्थानिक पथकाने दोन पंचांसह शिरुर बायपास रोडवर नाना स्पॉट ढाबा येथे छापा कारवाई करून दिपक बबन गुंजाळ याची अंगझडती घेतली. त्याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
आरोपी दिपक गुंजाळ याचेवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. त्याने सदरचे अवैध गावठी पिस्तुल बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू आहे याकरीता त्याला न्यायालयात हजर करेणत आलेले आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत.
याबाबत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी केली.