पुण्यात GBS चा धुमाकूळ सुरुच, रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला, परिस्थिती हाताबाहेर जाणार?
पुणे : पुणे शहरात सध्या गुईलेन बॅरी सिंड्रोमचे रूग्ण सातत्याने वाढत आहे. पुण्यासह आसपाच्या गावात जीबीएसचे रुग्ण वाढत असू शहरात जीबीएसचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. जीबीएसच्या वाढत्या रुग्णांमुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
पुण्यातजीबीएसचा उद्रेक सुरूच असून रविवारी नव्याने जीबीएसचे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता पुणे करांची चिंता वाढली आहे. सध्या पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या १५८ वर गेली आहे. रविवारी पुण्यात तीन नवीन रुग्ण आढळून आले. तसेच १५८ पैकी २१ रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर असून पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुषित पाण्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याची शंका महापालिका प्रशासनाला आहे. या आजाराचं मूळ शोधण्याचा प्रयत्न प्रसाशनाकडून केला जात आहे. यासाठी सिंहगड परिसरातील पाण्याचे नमुने फॉरेन्सिक टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. पण अजूनही रुग्ण वाढीचं कारण सापडू शकलं नाही.
पुण्यातील एकूण जीबीएस रूग्णांपैकी ३१ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील आहेत. तर ८३ रुग्ण सिंहगड रोड, किरकिटवाडी, नांदोशीसह आसपासच्या काही गावांमधील आहेत.
दुसऱ्या बाजुला १८ रुग्ण पिंपरी चिंचवड आणि १८ रुग्ण पुणे ग्रामीण भागातील आहेत. तर आठ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे पाच रुग्ण दगावले असून ३८ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.