आजपासून महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर झाले कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या…
पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या पेट्रोल व डिझेलच्या दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. इंधनाचा भाव वाढला की बजेटवर परिणाम तर इंधनाचा भाव कमी झाला की सामान्य नागरिकांचा आनंद गगनात मावत नाही. सध्या अर्थसंकल्प सादर झाला असून याकडे देशाचे लक्ष लागले होते.
आजचे दर पाहता पण, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याचे दिसून आले आहेत. यामध्ये आता पुणे शहरात पेट्रोल १०४.१४ डिझेल ९०.८८ तसेच रायगड पेट्रोल १०३.९६ डिझेल ९०.६२ रत्नागिरी पेट्रोल १०३.९६, डिझेल ९१.९६ सांगली पेट्रोल १०४.४८ डिझेल ९०.७९, सातारा पेट्रोल १०४ असे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान, आज ३ फेब्रुवारी २०२५ रोजी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले आहेत. तुम्ही घरबसल्या सुद्धा पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.
दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प अजून सादर करण्यात आला नाही. यामध्ये काय सूट मिळणार का? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात महागाई कमी होणार का? शेतकऱ्यांना निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.