देवाच्या दारातच चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, यवत येथील धक्कादायक घटना..
दौंड : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
यवत येथे रात्री मुक्कामासाठी मंदिरात थांबलेल्या आई शेजारी झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अतिप्रसंग करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवत पोलीसांनी एकाला अटक केली आहे.
कुणाल लक्ष्मण दोरगे ( रा.यवत ता.दौंड जि.पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहूतू नुसार, २५ जानेवारीला परप्रांतीय पीडित मुलीची आई रात्री उशीर झाल्यामुळे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेजारील एका मंदिरात दोन लहान मुलांसह विश्रांतीसाठी थांबली.
रात्रीच्या वेळी महिला झोपलेली असताना नराधमाने चार वर्षाच्या मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर अन्याय अत्याचार करण्याच्या प्रयत्न करीत असताना मुलीच्या आईला जाग आली. मुलगी शेजारी नसल्याने तिने परिसरात शोध घेतला. तिला हे कृत्य दिसले.
दरम्यान, तिने आरडाओरडा केल्याने नराधमाने तिथून पळ काढला. मात्र त्याचे हे कृत्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले होते. यवत पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे त्या नराधमाला त्याच्या राहते घरातून ताब्यात घेतले.