पुणेकरांनो सार्वजनिक ठिकाणी थुंकताना, कचरा करताना करा विचार, १५ दिवसात ३६ लाखांचा दंड वसूल, जाणून घ्या नियम…
पुणे : पुणे महापालिकेकडून १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत शहरात दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये ४५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुण्यात स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे. याबाबत महापालिका आक्रमक झाली आहे.
सध्या पुण्यामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. आता १८ दिवसांत ३६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळला आहे. येणाऱ्या काळात देखील अशी कारवाई सुरूच राहणार आहे. यामुळे आता घाण कारणासाठी चांगलाच चाप बसणार आहे.
पालिकेने आता सकाळी शहर स्वच्छ असावे, यासाठी प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीतूनच उचलण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहने याचे नियोजन महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. यामुळे शहर सकाळी चकाचक असणार आहे.
रस्त्यावर थुंकणे, उघड्यावर लघु शंका करणे, कचरा जाळणे, कचरा वर्गीकरण न करणे, बंदी असलेला मांजा विक्री, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, कचरा प्रकल्प बंद असणे, प्लास्टिक कारवाई अशा प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.