एकट्या मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्….!! केलं भयंकर कृत्य, घटनेने सगळेच हादरले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. गौरव चौहान असे या गैरकृत्य केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

12 वर्षीय मुलगी दादरच्या पूर्व भागातील शाळेत शिकत आहे. मुलगी शाळेत रेसलिंगच्या सरावासाठी आली होती. मुलगी शाळेच्या वर्गात एकटीच असल्याचे पाहून शिक्षक गौरव चौहान हा वर्गात शिरला. यावेळी त्याने हे धक्कादायक कृत्य केले आहे.

वर्गाबाहेर डोकावून बाहेर कोणी नसल्याची खात्री करून गौरवने वर्गाचा दरवाजा बंद केला. त्यानंतर गौरवने मुलीच्या इच्छेविरोधात नको त्या गोष्टी केल्या. शिक्षकाच्या या वर्तणुकीनंतर मुलगी मानसिक तणावाखाली होती. ती काही बोलत नव्हती गप्प बसून राहत होती.
पालकांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने सर्व गोष्टी सांगितल्या. यानंतर पालकांनी तत्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गौरव चौहान या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. यामुळे शाळेत मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत इतर पालकांनी देखील संताप व्यक्त केला.
