राज्यात पुढील दोन दिवस राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस! जाणून घ्या पावसाचा अंदाज….

सध्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली उद्यापर्यंत उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाकाही कमी – अधिक होत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात वातावरण बदल होताना दिसत आहेत.

राज्यातील थंडी मागील दोन दिवसांपासून कमी झाली. तसेच पावसाला पोषक हवामान होत आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. गुरुवारी पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.

तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. यामुळे या दिवसात शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
तसेच लातूर, नांदेड, हिंगोली, सोलापूर, सांगली, धाराशिव, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ उतार राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.