Jayant Patil : महाविकास आघाडीचे आंदोलन आणि जयंत पाटील अनुपस्थित, सरकारमध्ये जाण्याची रंगली चर्चा…

Jayant Patil : राज्यात सध्या महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मंत्री म्हणून अनेकांनी शपथ घेतली आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपूर विधानभवन परिसरात महाविकास आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात तीव्र आंदोलन केले.

यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. असे असताना मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची या आंदोलनातील अनुपस्थिती विशेषतः चर्चेचा विषय ठरली. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे ते महायुती सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शहांच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान ठरवून निषेध व्यक्त केला. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीने राज्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येत भाजपविरोधात लढा देण्याचे ठाम संकेत दिले. यामुळे नागपूरसह दिल्लीत देखील आंदोलन सुरू आहे. Jayant Patil

असे असताना जयंत पाटील यांची अनुपस्थिती का चर्चेत? जयंत पाटील हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. मात्र त्यांच्यासाठी महायुती सरकारने एक मंत्रिपद राखीव ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील यांची अनुपस्थिती पक्षांतर्गत मतभेद किंवा वैयक्तिक कारणांमुळे असू शकते, असे बोलले जात आहे.
दरम्यान, जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यांपैकी एक असून, त्यांच्या अनुपस्थितीने पक्षाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी उपस्थित इतर महत्त्वाच्या नेत्यांनी मात्र आपापल्या भूमिकांवर ठाम राहत अमित शहांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.