Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला मोठा धक्का, न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची कोठडी..

Allu Arjun Arrest : साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा २’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी आज अटक केली आहे.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली असून त्याची सरकारी रुग्णालयात त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली. एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनची हैद्राबादच्या गांधी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली.
त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आले. दरम्यान, अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे. Allu Arjun Arrest
अल्लू अर्जुन पुष्पा २ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी थिएटरमध्ये आला, त्यावेळी एकच गोंधळ, धावपळ सुरु झाली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तिच्यासोबत आलेला मुलगा गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा नोंदवला व नंतर त्याला अटक केली.