Maharashtra Politics : अखेर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या खासदाराचं मोठं वक्तव्य…

Maharashtra Politics : गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे.

या पाठोपाठ उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे.
त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, असं विधान आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं. त्यानंतर या चर्चांना बळ मिळालं. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी भाष्य केले आहे

आम्ही शरद पवार यांना एवढ्या वेळा भेटलो. मात्र अजित पवार यांच्यासोबत जायचं या मुद्यावर आमची कधीच चर्चा झाली नाही. आमच्या विश्वासहर्यातेवार या बातम्यांमुळे देखील यामुळे प्रश्न उपस्थित केले जातात त्यामुळे बातमी देताना तपासली जावी, असं अमर काळे यांनी म्हटलं आहे. Maharashtra Politics
अमित शाह काल शरद पवार यांना भेटल्याच्या बातम्या माध्यमात आल्या. यावर अमर काळे यांनी भाष्य केलं आहे. काल शरद पवार यांचा वाढदिवस होता. आम्ही तिथे ७ तास सोबत होतो त्यामुळे तिथं भेट झाली नाही हे मी दाव्याने सांगतो. भेटीच्या चर्चा मीडियामध्ये सुरू आहेत.अ
शी भेट झाली या बातमीत काही तथ्य नाही. आमचा कुठलाही खासदार नॉट रिचेबाल नाही हे मी दाव्याने सांगतो. अजित पवार यांच्यासोबत जाण्याची चर्चा आमची पक्षाच्या पातळीवर कुठेही कधीच झाली नाही, असं त्यांनी सांगितले आहे.