Pune News : भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या हत्तेप्रकरणी एक जण ताब्यात! सुपारी घेऊन हत्या झाल्याचा संशय बाळवला…

Pune News : आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घडली. मामा सतीश वाघ यांचा खून झाला असून यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला होता. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे.

हत्या करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट ५ च्या दरोडा व वाहनचोरी पथकाने आव्हाळवाडी (ता. हवेली ) येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे
वर्मा असे आरोपीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

विधान परिषदेचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 09) घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. Pune News
यावेळी पोलिसांना सतिश वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडला होता. गुन्हे शाखा युनिट ५ च्या दरोडा व वाहनचोरी पथकाने आव्हाळवाडी (ता. हवेली ) येथून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.