Crime News : धक्कादायक! विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच प्राचार्यांच्या डोक्यात झाडली गोळी, नेमकं घडलं काय?


Crime News : प्राचार्यांनी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची त्याच्या पालकांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्याने राग मनात धरून शाळेच्या आवारातच प्राचार्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना छतरपुर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सुरेंद्र कुमार सक्सेना (वय. ५५) असे हत्या झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते धमोरा राजकीय उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करत होते. विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सक्सेना यांची हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी शाळेच्या आवारात मुलींची छेड काढत होता. त्यामुळे मुलींनी आरोपीची तक्रार शाळेच्या शिक्षकांकडे आणि प्राचार्यांकडे केली होती. या तक्रारीनंतर शिक्षकांनी आरोपीला समज दिली. मात्र, आरोपीच्या वागण्यात काहीच सुधारणा होत नव्हती. तो अनेकदा शाळेत मुलींची छेड काढत होता. प्राचार्य सुरेंद्र कुमार सक्सेना यांनी आरोपी मुलाच्या वडिलांना शाळेत बोलावून घेत, त्याची तक्रार केली. Crime News

या घटनेमुळे विद्यार्थ्यांचा सक्सेना यांच्यावर राग होता. हा राग मनात धरून आरोपी मागील आठवडाभरापासून शाळेत कट्टा घेऊन येत होता. त्याने शाळेत अनेकांना धमकावले होते. ज्यांनी माझ्या वडिलांकडे माझी तक्रार केली, त्या शिक्षकांना जीवे मारणार, अशी उघड धमकी आरोपीने शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर दिली होती.

आरोपी विद्यार्थी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास थेट प्राचार्य सक्सेना यांच्या कार्यालयात घुसला. परंतु, तिथे प्राचार्य नव्हते. त्यामुळे त्याने कार्यालयाच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांबाबत विचारले. यावेळी एका विद्यार्थ्याने सक्सेना आरोपी विद्यार्थी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास थेट प्राचार्य सक्सेना यांच्या कार्यालयात घुसला. परंतु, तिथे प्राचार्य नव्हते.

त्यामुळे त्याने कार्यालयाच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांबाबत विचारले. यावेळी एका विद्यार्थ्याने सक्सेना बाथरुमच्या दिशेने गेल्याचे सांगितले. ही माहिती समजात आरोपी बाथरुमच्या दिशेने गेला आणि त्याने पाठीमागून थेट प्राचार्यांवर गोळीबार केला.

यातली एक गोळी प्राचार्य सक्सेना यांच्या डोक्यात लागली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. प्राचार्यांच्या हत्येनंतर आरोपीने प्राचार्यांची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला, मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी नौगांव परिसरातून ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!