Sharad Pawar : शपथविधी सोहळ्याला का नाही गेले? शरद पवारांचे थेट उत्तर, म्हणाले….

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केले होते. परंतु, अनेकांच्या मनात प्रश्न होता की, फडणवीसांनी स्वतः फोन करूनही शरद पवार का गेले नाहीत? यासंदर्भात शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी खुलासा केला आहे.
शरद पवार त्यांचे पुण्यातील निवासस्थान मोदी बाग येथे पत्रकारांशी बोलत होते. यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आणि नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार म्हणाले ‘नव्या सरकारला आमच्या शुभेच्छा, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, संसदेचे अधिवेशन सुरू होतं ते सोडून येणं शक्य नव्हतं म्हणून मी आलो नाही. असे ते म्हणाले आहे. Sharad Pawar
तसेच राज्यात विरोधीपक्ष नेता बाबा काय भूमिका? याबाबत विचारले असता पवार म्हणाले, राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल राज्यात विधानसभा ठरवेल, आम्ही काय सांगायचं. ईव्हीएमसंदर्भातील लढा कसा करणार आहे? याबाबत विचारले असता ‘चर्चा सुरू आहे लवकरच पुढील दिशा ठरवू आणि सांगू’ असेही शरद पवार म्हणाले आहे.
सोबतच ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘पिचड यांच्यासोबत अनेक आठवणी असून ते आदिवासी समाजाचे मोठे नेते होते. ज्यांनी आदिवासी समाजासाठी त्यांचे आयुष्य पेरले होते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.