Parbhani : भयंकर!! गंगाखेडमध्ये कुटूंबाच्या एकत्र आत्महत्येचे कारण अखेर समोर, ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने उचललं टोकाचे पाऊल…

Parbhani : एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेखाली जीव दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. गुरुवारी दुपारच्या तीन वाजता अचानक एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेखाली जीव दिला. मालगाडी आली आणि त्यांच्या अंगावरून गेली आणि सगळीकडे खळबळ उडाली.
ही घटना गंगाखेड तालुक्यातील धारासुर शिवारातील आहे. लोकांना लवकर लक्षात आलं नाही, पण जेव्हा हे शिक्षकाचे कुटुंब होतं, हे समजलं तेव्हा सारेच सुन्न झाले.
या घटनेत मसनाजी सुभाषराव तुडमे हे ४७ वर्षीय शिक्षक, त्यांची पत्नी ४२ वर्षीय रंजना मसनाजी तुडमे व वीस वर्षीय मुलगी अंजली मसनाजी तुडमे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. तुडमे हे गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते ते अहमदपूर तालुक्यातील किन्नीकुद्दू येथील रहिवासी होते. Parbhani
तसेच गुरुवारी दुपारी अचानक ही घटना घडल्यानंतर त्यांची धड आणि शीर वेगवेगळे झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता पोलीस तपासात ही घटना कशामुळे घडली हे उघडकीस आले आहे.
या घटनेतील मयत वीस वर्षीय मुलगी अंजली हिला माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ, फोटो व्हायरल करू अशी ब्लॅकमेलिंगची धमकी देण्यात आली होती.
त्यामुळे बदनामीपेक्षा या शिक्षकी कुटुंबाने मृत्यूला कवटाळल्याचे या घटनेतून उघडकीस आले आहे. २८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. घटना घडल्यानंतर सहाय्यक निरीक्षक सुनील इंगळे यांनी तपासाला सुरुवात केली.
तेव्हा एका सीडीआरवरून पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी शिवम नारायण राऊत (रा. परभणी) या युवकाला तपासासाठी बोलवले, तेव्हा त्याच्या चौकशीतून संबंधित मुलीस व तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेलिंग केल्याचे उघडकीस आले आहे.