Devendra Fadnavis : शपथविधी सोहळ्यापूर्वी मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन, काय झालं बोलणं?

Devendra Fadnavis : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. या नेतृत्वातील सरकारच्या शपथविधीस काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. . मात्र या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र आज होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोनवरून दिल्याचे सांगितले जात आहे. Devendra Fadnavis

मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवले आहे. अशी माहिती समोर आली आहे.