Sharad Pawar : विधानसभेतील निकालानंतर शरद पवारांना पहिला सर्वात मोठा धक्का! बडा नेता अजित पवार गटात जाणार…

Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून २३४ जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार)जेमतेम १० आमदार निवडून आले आहेत.
तर, अजित पवार गटाचे ४० च्या वर आमदारांनी विजयी गुलाल उधळला आहे. अशात शरद पवारांना मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. निवडणूक होण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक बड्या नेत्यांनी पक्षप्रवेश केल्याचे दिसून आले आहे.

यामध्ये अजित पवार गटातील अनेक नेत्यांचं इनकमिंग दिसून आले आहे. मात्र, निवडणुकीनंतर चित्र पालटले आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांची इनकमिंग सुरू झाली आहे.
अशात राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ते राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. असं झाल्यास शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. निवडणुकीतील पराभवानंतर हा शरद पवारांना पहिला मोठा धक्का असेल
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार राहुल जगताप हे पक्षाला रामराम ठोकणार असल्याची माहिती आहे. याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगत आहेत. राहुल जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हंटले जात आहे.