Pune News : पुणे हादरलं! शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची हत्या, शिक्रापूरमध्ये नेमकं घडलं काय?

Pune News : शिक्रापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रापूर ग्रामपंचयातचे माजी उपसरपंच आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जुन्या वादातून एका युवकाने भरदिवसा त्यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या केली. गिलबिले यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. Pune News
नेमकं घडलं काय?
शिक्रापूर येथे आज रविवारी (१ डिसेंबर) रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले होते. त्यावेळी अज्ञात आरोपींनी अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर वार केले.
त्यामुळे ते गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांच्यावर वार केल्यानंतर आरोपींनी घटना स्थळवरून पळ काढल्याची माहिती आहे. घटना समजल्यानंतर गिलबिले यांना तात्काळ पुणे येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे