Pune Crime : साठ वर्षांच्या आजोबांचा कारणामा!! दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील घटनेने खळबळ…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शेजारी राहणाऱ्या साठ वर्षाच्या आजोबाने चॉकलेट खायला देण्याच्या आमिषाखाली वेळोवेळी घरी नेऊन दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६० वर्षीय या व्यक्तीने घराबाहेर खेळणाऱ्या दोन मुलींना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवले. चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले व त्यांच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. Pune Crime
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ही घटना मुलींनी त्यांच्या आईला सांगितली आणि घाबरलेल्या आईने थेट मुंढवा पोलीस ठाणे गाठले. या घटनेची माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांना दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देत या नराधमाला अटक केली आहे.