Maharashtra Election : ब्रेकिंग! राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी, निवडणूक आयोगाचा निर्णय…


Maharashtra Election : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. ती मागणी मान्य झाली आहे.

सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. Maharashtra Election

प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत. सीमा हिरे यांना १ लाख ४१ हजार ७२५ मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर यांना ७३ हजार ६५१ मते मिळाली आहेत. तर मनसेच्या उमेदवाराला ४६ हजार ६४९ मते मिळाली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!