Nana Patole : मोठी बातमी! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा? महत्वाची माहिती आली समोर…


Nana Patole :  विधानसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर नाना पटोले दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याची सांगितले जात होतं.

त्यानंतर आज काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. Nana Patole

दुसरीकडे काँग्रेसच्या हायकमांडने नाना पटोले यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांचा पराभव झालेला आहे. यासर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!