Maharashtra Election Result : ब्रेकिंग! शरद पवारांचे पाच प्रमुख शिलेदार पिछाडीवर, पवारांना मोठा धक्का….

Maharashtra Election Result : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात पुढील सरकार कुणाचं येणार? याचा फैसला आज होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सध्या तरी पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.
अजून मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी असून पवारांच्या उमेदवारांना विजयी होण्यासाठी आता अन्य फेऱ्यांमध्ये चांगली आघाडी घ्यावी लागणार आहे.

कोणत्या मतदारसंघात काय आहे स्थिती?
बारामती
तिसरी फेरी – अजित पवार : ९२०६
युगेंद्र पवार : ५००७
तिसरी फेरी आघाडी टोटल : ४१९९
तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार १११७४ मतांनी आघाडीवर
माऊली कटके ८२८१
अशोक पवार ६३०३
इंदापूर विधानसभा मतदारसंघ
पहिल्या फेरी अखेर
पहिल्या फेरीतील मते दत्तात्रय
भरणे ४८६६
हर्षवर्धन पाटील ४५३०
प्रवीण माने १२५०
दत्तात्रय भरणे ३३६ मतांनी आघाडीवर
कर्जत जामखेड
राम शिंदे आघाडीवर, रोहित पवारांना धक्का
राम शिंदे ५४१ मतांनी आघाडीवर.
आंबेगाव विधानसभा/पुणे
पाचवी फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील १५०८ मतांनी आघाडीवर, देवदत्त निकम पिछाडीवर