Maharashtra Election Result : बारामतीत अजित पवारांची आघाडी, युगेंद्र पवारांना धक्का, राज्यात काय आहे चित्र, वाचा….

Maharashtra Election Result : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. गेल्या महिन्याभरापासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीत बारामती हा मतदासंघ सुरूवातीपासून चर्चेत राहिला आहे.

या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, आज २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीदरम्यान बारामती मतदारसंघाचा पहिला कल हाती आला आहे.
मतमोजणीच्या पहिल्याच कलात शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार हे आघाडीवर होते. त्यानंतर काही वेळातच चित्र पालटलं आणि अजित पवारांनी ३६२३ मतांनी आघाडी घेतली आहे. Maharashtra Election Result

पोस्टल मतमोजणीमध्ये युगेंद्र पवार हे आघाडीवर होते. त्यानंतर सुरू झालेल्या पहिल्या फेरीमध्ये बारामतीत अजित पवार 3623 मतांनी आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार अजित पवार यांना पडलेली मते ९२९१ इतकी आहेत.
तर युगेंद्र पवार यांना पडलेली मते ५,६६८ इतकी आहेत. अजित पवारांची पहिल्या फेरीत आघाडी घेतली. सुपे भागातील मतमोजणीचा पहिल्या मतमोजणीत समावेश आहे.