Pune : पुण्यात खळबळ! प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण करून खून…

Pune : पुणे जिल्ह्यात लोकप्रिय असलेले प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.मात्र जाधव यांनी आरोपींची मागणी मान्य न केल्याने त्यांचा खून करण्यात करण्यात आल्याची माहिती आहे.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी आणि औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने तपास करून हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पंडित रामचंद्र जाधव (वय ५२, रा. जाधववाडी डॅमजवळ, नवलाख उंबरे, ता. मावळ) असे खून झालेल्या गाडामालकाचे नाव आहे. तर सूरज मच्छिंद्र वानखेडे (वय २३, रा. जाधववाडी डॅमजवळ, नवलाख उंबरे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune
सविस्तर माहिती अशी की, पंडित जाधव यांचे १४ नोव्हेंबर रोजी खंडणीसाठी अज्ञातांनी अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान आरोपींनी जाधव यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला.
दरम्यान, या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सुरज वानखेडे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून केला जात आहे. पंडित जाधव यांच्याकडे मॉगी नावाचा बैल आहे. त्याने अनेक शर्यतीमध्ये मैदान मारले आहे. त्यामुळे जाधव यांचा पंचक्रोशीत नावलौकिक होता.