Exit Poll : पुणे जिल्ह्यात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलची संपूर्ण माहिती आली समोर…


Exit Poll : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी (ता.२०) नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

सहा महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा यावेळी टक्का वाढल्याचे दिसून आले आहे. अखेरच्या काही तासांता मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळाले.

तसेच रात्री ११.४५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झाले आहे. अशातच आता एक्झिट पोल समोर आले आहेत. यानुसार पुणे शहरातील आठ मतदारसंघात कोण बाजी मारणार ? त्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Exit Poll

मॅट्रिझ पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीच्या वाट्याला ११० ते १३० जागा तर इतरांना ८ ते १० जागा मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चाणक्यनुसार महायुतीला १५२ ते १६० आणि इतरांना ६ ते ८ जागा मिळतील जेव्हीसीनसुार महायुतीला १५८ ते १५९ जागा, महाविकास आघाडीला ११५ते ११६ जागा आणि इतरांना १२ ते १३ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दहा, भाजपचे आठ, कॉंग्रेसचे ३ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक आमदार आहेत. अशातच आलेल्या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यातील एकूण २१ मतदारसंघापैकी बोलायचे झाल्यास ११ जागा या महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे. तर दहा जागा या महायुतीला जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

पुणे जिल्ह्यातील कोणत्या जागा कुणाला जाणार मिळणार…

१९५ – जुन्नर – महाविकास

१९६- आंबेगाव – महाविकास

१९७ – खेड आळंदी – महाविकास

१९८ – शिरुर – महायुती

१९९ – दौंड – महाविकास

२०० – इंदापूर – महाविकास

२०१- बारामती -महायुती

२०२ – पुरंदर – महाविकास

२०३- भोर – महाविकास

२०४ – मावळ – महायुती

२०५- चिंचवड -महायुती

२०६- पिंपरी -महायुती

२०७ – भोसरी – महायुती

२०८ – वडगाव शेरी -महाविकास आघाडी

२०९- शिवाजीनगर – महायुती

२१० – कोथरुड – महायुती

२११ – खडकवासला – महायुती

२१२- पार्वती -महायुती

२१३- हडपसर -महाविकास आघाडी

२१४ – पुणे कॅन्टोन्मेंट -महाविकास आघाडी

२१५ – कसबा पेठ – महाविकास आघाडी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!