CBSE Board Exam 2025 : सीबीएसई बोर्डाने जाहीर केलं दहावी बारावीचं वेळापत्रक, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक…
CBSE Board Exam 2025 : सीबीएसईने इयत्ता १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षांचे विषयनिहाय वेळापत्रक जारी केले आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
तसेच १५ फेब्रुवारी २०२५ पासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे. इयत्ता १०वीची परीक्षा १८ मार्चला तर,१२वीची परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहे. सीबीएसई १०वी,१२वीच्या परीक्षेचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील आणि दुपारी १.३० वाजता संपतील.
सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच म्हणजे २३ दिवस आधी प्रसिद्ध केले आहे. सीबीएसई बोर्डने इयत्ता १० वी आणि १२वी परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केले आहे. तसेच Date Sheet Main Exam pdf पाहू शकता.
या वर्षी, सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२५ भारतातील ८,००० शाळांसह २६ परदेशी देशांतील ४४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणार आहे. या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ७५% उपस्थिती आवश्यक असेल.
जेईई मेन आणि नीट सारख्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकाचा विचार करून बारावीच्या परीक्षा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत, असे बोर्डाने एका नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. CBSE Board Exam 2025
एकाच विद्यार्थ्याने दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी दिल्या जाऊ नयेत, यासाठी ४० हजारांहून अधिक विषयांची सांगड घालून वेळापत्रक तयार करण्यात आले. वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि पहिला पेपर इंग्रजीचा असेल. तसेच12वीची परीक्षा ही १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
सीबीएसई बोर्ड इयत्ता १०वीचे वेळापत्रक…..
विषय तारीख
इंग्रजी संभाषण/इंग्रजी भाषा आणि साहित्य 15 फेब्रुवारी 2025
विज्ञान 20 फेब्रुवारी 2025
फ्रेंच/संस्कृत 22 फेब्रुवारी 2025
सामाजिक शास्त्र 25 फेब्रुवारी 2025
हिंदी अभ्यासक्रम A/ B 28 फेब्रुवारी 2025
गणित 10 मार्च 2025
माहिती तंत्रज्ञान 18 मार्च 2025
सीबीएसई बोर्ड इयत्ता १२वीचे वेळापत्रक…..
विषय तारीख
शारीरिक शिक्षण 15 फेब्रुवारी 2025
भौतिकशास्त्र 21 फेब्रुवारी 2025
व्यवसाय अभ्यास 22 फेब्रुवारी 2025
भूगोल 24 फेब्रुवारी 2025
रसायनशास्त्र 27 फेब्रुवारी 2025
गणित – मानक / उपयोजित गणित 8 मार्च 2025
इंग्रजी इलेक्टिव्ह/इंग्रजी कोर 11 मार्च 2025
अर्थशास्त्र 19 मार्च 2025
राज्यशास्त्र 22 मार्च 2025
जीवशास्त्र 25 मार्च 2025
अकाउंटन्सी 26 मार्च 2025
इतिहास 1 एप्रिल 2025
मानसशास्त्र 4 एप्रिल 2025