Sharad Pawar : धंद्यात मदत केली, आमदारकी, मंत्रिपद सगळं दिलं, पण हा रुपया खोटा निघाला, भरणेंना पाडायचं पाडायचं! इंदापूरच्या सभेत शरद पवार बरसले…


Sharad Pawar : छत्रपती कारखाना भरणेंच्या हातात दिला, ही आमची चूक झाली. इतर कारखान्यांपेक्षा या कारखान्यात भाव कमी मिळतो. ६०० रुपये भाव कमी मिळतो. अनेक गोष्टींमध्ये भरणेंना मदत केली. गुजरातच्या उद्योगपतींकडून मदत मिळवून दिली. त्यांना वाहतुकीच्या धंद्यात मदत केली. निवडणुकीला उभं राहायचं म्हणाले.

जिल्हा परिषद, विधानसभा , मंत्रिपद दिले. सगळे दिल्यावर निघून गेला. ही कसली माणसे आहेत. यांच्या पाठिला कणा नाही. हे नेतृत्व खोटे निघाले. रुपया खोटा निघाला. उद्याचं निकाल घावा लागला. भरणेंना… पाडा… पाडा ..पाडा ..हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते इंदापूरमध्ये बोलत होते. हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारसभेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, सध्या तरुण पिढीमध्ये बेकारीचं प्रमाण वाढलं आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये ४ लाख विद्यार्थी शिकतात. बारामती सारख्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठाण सारखी संस्था स्थापन काढली. हर्षवर्धन पाटलांनी देखील काही संस्था काढल्या. चिंता एका गोष्टीची आहे, मुले शिकली पण सर्वांनाच नोकऱ्या मिळत नाहीत.

त्यामुळे तरुण निराशेत जगतो. ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते लोक बेकारी कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. पण तसं काही झालं नाही. महाराष्ट्रात अनेक चांगले कारखाने होते, लोकांच्या हाताला काम देत होते. देवेंद्र फडणवीसांचं राज्य आलं, हळूहळू महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला गेले. Sharad Pawar

आम्ही ठरवलं घटनेला धक्का लागू द्यायचा नाही. मोदींना ४०० जागा मिळू द्यायचे नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया चौथ्यांदा उभी राहिली. तिला तुम्ही साथ दिली. महाराष्ट्रात अनेक जागा तुम्ही निवडून दिल्या. आता विधानसभेची निवडणूक आहे.

राज्य चांगल्या वाटेवर आणण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आपल्या राज्याचा पहिला क्रमांकावर होता. फडणवीसांचे आणि भाजपचं राज्य आलं की, आपण सहाव्या क्रमांकावर आलो. दिवसेंदिवस आपली निर्यात कमी होताना दिसत आहे, असेही शरद पवारांनी नमूद केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!